Mahabharat Katha: पांडवांचा अज्ञातवास; शापामुळं अर्जुनानं 'या' रुपात व्यतीत केलं जीवन

महाभारतात (Mahabharat) कौरवांनी पांडवांचा जुगाराच्या खेळात धूर्तपणे पराभव केला.
Mahabharat Katha: पांडवांचा अज्ञातवास; शापामुळं अर्जुनानं 'या' रुपात व्यतीत केलं जीवन
PandavaDainik Gomantak

महाभारतात (Mahabharat) कौरवांनी पांडवांचा जुगाराच्या खेळात धूर्तपणे पराभव केला. याचा फटका पांडवांना सहन करावा लागला. यामुळे त्यांना 12 वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात जावे लागले. पांडवांनी त्यांची आई कुंती आणि पत्नी द्रौपदी यांच्यासोबत 12 वर्षे जंगलात वास्तव्य केले. वनवासाची वेळ आली तेव्हा सर्वांसमोर आव्हान उभे राहिले. पांडवांनी धैर्याने या आव्हानाचा सामना केला आणि विराट नगरच्या राजा विराटच्या ठिकाणी आपला वेश बदलून अज्ञातवास पूर्ण केला. (Mahabharat Katha Pandavas spend year in agyatwas Arjuna became transgender)

युधिष्ठिराला यक्षाकडून वरदान मिळाले

आशुतोष गर्ग यांनी आपल्या अश्वत्थामा या पुस्तकात लिहिले आहे की, 'युधिष्ठिराला वनवासात यक्षाच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. युधिष्ठिराने यक्षाच्या शंभर प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. त्याबदल्यात त्याला वरदान मिळाले.' युधिष्ठिराने यक्षाला सांगितले की, 'मला एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. आम्ही कुठे राहणार आहोत हे कोणालाच कळू देऊ नकोस. मात्र कळून आल्यास आम्हाला पुन्हा वर्षभर अज्ञातवासात राहावे लागेल.' युधिष्ठिराने यक्षाला असे वरदान देण्यास सांगितले की, 'वनवासाच्या काळात त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोणीही ओळखू शकणार नाही. यक्ष अस्तु म्हणाला.'

 Pandava
कोण आहे तजिंदर बग्गा? 'प्रशांत भूषण यांना थप्पड मारणारा...'

दरम्यान, पाच पांडव त्यांची आई कुंती आणि पत्नी द्रौपदी विराट नगरात पोहोचले. प्रत्येकजण वेगवेगळ्या लोकांच्या वेशात होते. युधिष्ठिर हा द्यूत खेळण्यात पारंगत होता. ब्राह्मणाच्या वेशात तो राजा विराटच्या भेटीला पोहोचला. राजाने त्याच्यावर खूष होऊन त्याला स्वतःच्या मनोरंजनासाठी ठेवले. युधिष्ठिर राजासोबत द्यूत खेळत असे.

भीम स्वयंपाकी झाला

भीमाला पाकशास्त्राचे चांगले ज्ञान होते. चविष्ट पदार्थ बनवण्यात तो निष्णात होते. तो आधुनिक काळातील शेफ बनला होता. राजा विराटाच्या स्वयंपाकघरात तो काम करु लागला. तसेच नकुलाला अश्वशास्त्राचे ज्ञान होते म्हणून त्याने राजाच्या तबेल्यांचे काम हाती घेतले. त्याचवेळी सहदेव राजा विराटच्या गौशालेत काम करु लागला.

 Pandava
Jammu And Kashmir: अमरनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार

अर्जुन बनला किन्नर

अर्जुनाला स्वर्गीय अप्सरा उर्वशीने वर्षभर किन्नर म्हणून राहण्याचा शाप दिला होता. अर्जुन या शापाचा वापर स्वत:नुसार करत असे. तो शाप पूर्ण करण्यासाठी अर्जुनासाठी वनवासाची वेळ योग्य होती. अर्जुन किन्नर झाला आणि वृहन्ला राजा विराटाच्या भेटीला पोहोचला. त्याला नृत्यकलेतील उत्तम ज्ञान होते. अर्जुनाने राजा विराटची कन्या उत्तरा हिला नृत्यकला शिकवायला सुरुवात केली.

तसेच द्रौपदी विराट नगरच्या राणीची दासी झाली. विराट नगरीत सर्व पांडवांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. तिथे त्यांची खरी ओळख कुणालाच कळली नाही आणि सगळ्यांनी आपला वनवास पूर्ण केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.