'एमडीएच’ मसाल्यांचे मालक 'महाशयजीं'चं निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

एमडीएच’ मसाल्यांच्या जाहिरातींमुळे प्रसिद्ध 'दादाजी' किंवा 'महाशयजी' म्हणजेच ‘एमडीएच’ मसाले ब्रँडचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे आज ९७ व्या वर्षी निधन झालं.

नवी दिल्ली :   'एमडीएच’ मसाल्यांच्या जाहिरातींमुळे प्रसिद्ध 'दादाजी' किंवा 'महाशयजी' म्हणजेच ‘एमडीएच’ मसाले ब्रँडचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे आज ९७ व्या वर्षी निधन झालं. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि पहाटे साडेपाच वाजता त्यांचं निधन झालं. 

धरमपाल गुलाटी यांचा जन्म १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट इथं झाला होता. धरमपाल गुलाटी शाळा सोडल्यामुळे सुरुवातीच्याच काळात वडिलांच्या मसाल्याच्या व्यवसायात सामील झाले. भारत-पाकिस्तान विभाजनानंतर ते अमृतसरमधील निर्वासित छावणीत मुक्काम करण्यासाठी भारतात आले. त्यानंतर त्यंनी दिल्लीच्या करोल बाग इथं मसाल्यांचे एक दुकान उघडलं आणि काही वर्षांनी ते एमडीएच मसाला ब्रँड म्हणून लॉन्च केले.

संबंधित बातम्या