महाशिवरात्री 2021: हिंदू महासभेच्या अधिकाऱ्यांनी केली ताजमहाल येथे शिव पूजा

महाशिवरात्री 2021: हिंदू महासभेच्या अधिकाऱ्यांनी केली ताजमहाल येथे शिव पूजा
Mahashivratri 2021 Hindu Mahasabha official perform Shiva Puja rituals at Taj Mahal

आग्रा: आग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनेची महिला आणि दोन कार्यकर्ते महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजन करण्यासाठी ताजमहाल येथे पोहचले  या तीघांना सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यानंतर तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस या तीघांची चौकशी करत आहेत. 

आज गुरुवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेने महाशिवरात्री निमित्त ताजमहाल ला तेजोमय महाल मानून त्या ताजमहालची पूजा केली. हिंदू महासभेच्या प्रांतीय अध्यक्षा  हिंदू महासभेच्या मीना दिवाकर यांनी मध्यवर्ती टाकीजवळील डायना बेंचजवळ त्यांनी पुर्ण परंपरा, प्रथेसह आरती करण्यास सुरवात केली. याचवेळी सीआयएसएफच्या जवानांनी त्याला पकडले.  

मीना दिवाकर यांच्यासह आणखी दोन कार्यकर्ते पकडले गेले आहेत. सीआयएसएफने तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि ताजगंज पोलिस ठाण्यात आणले. या माहितीवरून हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट, जिल्हाध्यक्ष रौनक ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते ताजगंज पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. 

दरम्यान ताजमहालमध्ये तीन दिवसीय शाहजहां उर्स चालू आहे. नियमांनुसार, ताजमहाल पारंपारिक जुम्, नमाज आणि शाहजहांच्या उर्स वगळता इतर कोणत्याही धार्मिक कार्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. यापूर्वी देखील एका संस्थेने ताजमहाल परिसरात हनुमान चालीसाचे पठण केले होते. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com