Coromandel Express Accident: ओडिशात भीषण अपघात; सुमारे 50 जणांच्या मृत्यूची शक्यता, 132 गंभीर जखमी

Coromandel Express Train Accident In Odisha: ओडिशाच्या बालासोरमध्ये मालगाडीला धडकल्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले.
Coromandal Express
Coromandal ExpressDainik Gomantak

Coromandel Express Odisha

हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बालासोरपासून 40 किलोमीटर अंतरावर मालगाडीला ही ट्रेन धडकली.

मालगाडीला धडक दिल्यानंतर ३ स्लीपर कोच वगळता बाकीचे डबे रुळावरून घसरले. प्राथमिक माहितीत या डब्यांची संख्या 18 असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 50 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 132 प्रवाशी गंभीर जखमी आहेत.

या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे, ज्यांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक एकवटले आहेत. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते.

ओडिशातील बालासोरजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले.

Coromandal Express
CJI Chandracud : चंद्रचूड यांना ट्रोल करणारे भाजपा समर्थक; रिसर्च पेपरमधून धक्कादायक खुलासे

दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्या

या दुर्घटनेत, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 132 प्रवासी जखमी झाले आहेत. अनेकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना कशी घडली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्नल बिघडल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर येऊन धडकल्याची माहिती आहे.

मालगाडीचे इंजिन ट्रेनवर चढले

हा अपघात इतका भीषण होता की रेल्वेचे इंजिन मालगाडीवर चढले. या धडकेत कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे मोठे नुकसान झाले. जवळपास संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरली. यामध्ये अनेक लोक अडकले आहेत, ज्यांना स्थानिक लोक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की रेल्वेचे इंजिन मालगाडीवर चढले.

Coromandal Express
Indian Fishermen : 200 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तान सुटका करणार

ODRAF आणि जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना

एसआरसीने या अपघाताबाबत सांगितले की, बहनगा रेल्वे स्थानकाजवळ हावडा-शालीमार एक्स्प्रेस गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

SRC ने ODRAF टीम घटनास्थळी रवाना केली आहे जेणेकरून तात्काळ बचाव कार्य करता येईल. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष क्रमांक जारी

कोरोमंडल एक्सप्रेस (शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस 12841) ला अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. सध्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अपघाताच्या माहितीसाठी प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com