केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कामाच्या ठिकाणी उपलब्ध होणार लस

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून  कामाच्या ठिकाणीही आता कोरोना लस देण्यात येणार आहे.

देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असूनही कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. रोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत असताना दिसत आहे. देशातील कोणत्याही भागामध्ये कोरोना लसीचा तुटवडा कमी पडणार नसल्याची माहीती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून  कामाच्या ठिकाणीही आता कोरोना लस देण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधी तयारी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. 11 एप्रिलपासून यासंबंधी कार्यवाही करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांना या संबंधी पत्र पाठवले आले आहे. त्यामध्ये 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोक संघटीत आणि असंघटीत क्षेत्रामध्ये कार्यरत असून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सेवा देत आहेत. (A major decision by the central government Vaccines will be available at work) 

कोरोनामुळे गंभीर परिस्थिती झालेल्या 11 राज्यांची यादी; केंद्रीय आरोग्य...

पत्रानुसार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रेदशांच्या सहकार्याने लसीकरण कार्यक्रमात अधिक व्यवहार्य आणि लाभारर्थी व्यक्तीसाठी लस देण्यात येणार आहे. कोवीड-19 लसीकरणाचे सत्रे सरकारी आणि खाजगी क्षेत्रामधील कामाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

देशामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठय़ाप्रमाणात वाढत असल्याकारणाने लसीकरणाची आवश्यकता भासत आहे. सध्या राज्यात मृत्यू दर 1.88 टक्के आहे. तर आत्तापर्यंत 55655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

संबंधित बातम्या