सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 'हिंदू महिला पतीच्या संपत्तीत माहेरच्या व्यक्तींना वारस नेमू शकते'

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

हिंदू महिला संपत्तीत माहेरच्या व्यक्तींना वारस म्हणून नेमू शकते.

नवी दिल्ली: संपत्तीच्या संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विधवा महिलेला आता आपल्या संपत्तीचा वारस म्हणून माहेरच्या व्यक्तीस नेमू शकते. असं न्यायालयाने म्हटले आहे. हिंदू कायद्यानुसार कायदेशीर भाषेत हिंदू महिलेच्या माहेरच्या व्यक्तींना अनोळखी म्हणून गणले जाणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्याचबरोबर ती महिला आपल्या स्व:इच्छेने आपल्या संपत्तीचा मालकी हक्क या व्यक्तींना सोपवू शकते असंही न्यायालयाने म्हटले आहे. न्य़ायालयाने गुरुग्राममधील एका कौटुंबिक प्रकरणाच्या संदर्भात ही निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान म्हणून केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. 

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महिलेच्या माहेरच्या कोणत्याही व्य्क्तीला तिच्या कुटुंबाचा भाग मानण्यात यावे. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती आर.सुभाष रेड्डी यांच्य़ा खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या खटल्यामध्ये महिलेने आपल्या पतीकडील संपत्तीच्य़ा वारसामध्ये माहेरच्या व्यक्तीचा समावेश केला होता. तिच्या या निर्णयाच्या विरोधात तिच्या दिराने आणि मुलांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र तिच्य़ा निर्णयाला तिच्याच दिराने विरोध करत भावाच्या मुलांना संपत्तीच्या वारसामध्ये सहभाग करण्यात येवू नये अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हिंदू महिला संपत्तीत माहेरच्या व्यक्तीला वारस म्हणून नेमू शकते असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

संबंधित बातम्या