मलाला युसूफझाई झाली पदवीधर

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

ब्रिटनमधील नामांकित ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

लंडन

शांततेचे नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई (वय २२) हिने ब्रिटनमधील नामांकित ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात तिने पदवी मिळविली आहे. मलालाने ऑक्सफर्डच्या लेडी मार्गारेट हॉल महाविद्यालयात शिक्षण घेतले. पदवीधर झाल्याची माहिती तिने शुक्रवारी सोशल मीडियावरून दिली. आयुष्यातील हा आनंदाचा क्षण कुटुंबासोबत साजरा करतानाची दोन छायाचित्रेही तिने पोस्ट केली आहेत. ‘‘पुढे काय करायचे हे मी अद्याप ठरविलेले नाही; पण आत्ता मात्र नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहणे, वाचन करणे आणि झोप असे माझे नियोजन आहे,’’ असे तिने म्हटले आहे.

 

 

संबंधित बातम्या