"पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना घाबरतात का ?"

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

आज पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conference) मिटींग घेतली.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banrjee) या नेहमी आपल्या कठोर भूमिकांमुळे चर्चेत असतात. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि ममता बॅनर्जी यांच्या गेल्या काही काळापासून राजकीय वाद सुरु आहे. त्यातच आज पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conference) मिटींग घेतली. या मीटिंगमध्ये पंतप्रधानांनी आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही असा आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (Mamata Banerjee criticized Narendra Modi for the virtual meeting.)

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मिटींगमध्ये (Meeting) आपल्याला फक्त पुतळा बनवून बसवले' अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आम्ही कागद पत्र घेऊन या मिटिंग साठी तयार होतो मात्र पंतप्रधानांनी आम्हाला बोलण्याची संधीच दिली नाही. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांंना का घाबरतात असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांच्या अशा वागण्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांमध्ये अपमानित झाल्याची भावना निर्माण झाली आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.  

COVID19: ऐकावं ते नवलच! कोरोनाच्या भीतीने माकडांचही केलं विलगीकरण

"पंतप्रधानांनी या मीटिंगमध्ये एकदाही लसींची उपलब्धता, रुग्णालयांतील बेडची कमतरता आणि ब्लॅक फंगस सारख्या परिस्थितीची विचारपूस केली नाही. आपल्याला वाटले होते की, आम्ही लसींची मागणी करू जेणेकरून सर्वांचे लसीकरण करता येईल. पंतप्रधान म्हणत आहेत की कोरोना कमी झाला आहे, मात्र जर कोरोना कमी झाला असेल, तर एवढे मृत्यू का होता आहेत?" असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परीषदेत ममता बॅनर्जी असेही म्हणाल्या की,"पंतप्रधान बंगालमध्ये आले आणि कोरोना वाढवुन गेले. 

संबंधित बातम्या