'ममता बॅनर्जी देशाला धोकादायक' योगी सरकारच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

 योगी  सरकारमधील  संसदीय  कामकाजमंत्री  आनंद  स्वरुप  शुक्ला  यांनी  पश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री  ममता  बॅनर्जी  यांच्यावर  केलेल्या  टीकेमुळे  नव्या  वादाला  तोंड फुटले  आहे.

लखनऊ : योगी  सरकारमधील  संसदीय  कामकाजमंत्री  आनंद  स्वरुप  शुक्ला  यांनी  पश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री  ममता  बॅनर्जी  यांच्यावर  केलेल्या  टीकेमुळे  नव्या  वादाला  तोंड फुटले  आहे. ममतांना  हिंदूवारोधी  घोषीत  करत  इस्लामी  दहशतवादी  असल्याचं त्यांच्याकडून  म्हणण्यात  आले  आहे.

शुक्ला  एवढच  म्हणून  थांबले  नाहीत  तर  त्यांनी  ममता  बॅनर्जी  यांच्यामुळे  देशाला  धोका  असल्याची  टीका  ही  केली. तसेच  बंगाल  निवडणुकानंतर   ममतांनी  बांगलादेशात आश्रय  घ्यावा  असेही  त्यांनी  म्हटले. उत्तरप्रदेशातील  बलिया  येथे  पत्रकारांशी  संवाद साधत  असताना  शुक्ला  म्हणाले, "ममतांचा  भारतावर  विश्वास  नाही. त्या  बंगालमध्ये  हिंदू  देवदेतांना  त्या  अपमानित  करतात  तसेच  मंदिरं  तोडण्याची  कामे  ही  त्यांनी  केली आहेत. त्या  बांगलादेशाच्या  इशाऱ्यावर  काम  करतात" असे  धक्कादायक  आरोप  केले आहेत.

आगामी  निवडणुकांमध्ये  ममतांचा  दारुण  पराभव  होईल. आणि  निवडणूकीनंतर  त्यांना बांग्लादेशात  आश्रयचं  घ्यावा  लागेल  असही  ते  म्हणाले. बंगालमध्ये  बहुसंख्य  हिंदू भाजपच्या  बरोबर  असल्याचा  दावाही  शुक्लांनी  केला. ममता  या  केवळ  नि  केवळ मुस्लिमांच्या  नेत्या  आहेत. बंगालमधील  जनतेनं  ममता  बॅनर्जी  यांना  सत्तेपासून  दूर ठेवण्याचा  निर्धार  केला  आहे. असंही  शुक्लांनी  यावेळी  म्हटले.

संबंधित बातम्या