जखमी वाघीण विजयी! भाजपचे सुवेंदू अधिकारी पराभूत

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर होता आहेत.

देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर होता आहेत. एकीकडे कोरोनामुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र निवडणुकांचे जोरदार वारे वाहत होते. त्यातच आता नंदीग्राम मधून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी बाजी मारली असल्याचे समजते आहे.

भारतीय जनता पक्षाने BJP)पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta BAnerjee) यांच्या विरोधात सुवेन्दू अधिकारी यांना उमेदवारी दिली होती. पश्चिम बंगलामध्ये तृणमुल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरला होता. मात्र ममता बॅनर्जी यांनी खेला होबे म्हणत भाजपला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचेच परिणाम आज निवडणुकांच्या निकालात पाहायला मिळता आहेत. ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून भारतीय जनता पक्षाचे सुवेंदू अधिकारी यांचा 1200 मतांंनी पराभव केला आहे.  भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करता ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आज निकाल सुरू असून, पश्चिम बंगलामध्ये तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. आसाम मध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असून तमिळनाडू मध्ये एडीएमके आणि केरळ मध्ये एलडीएफ हे पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या