"बंगालची जनता ममता बॅनर्जींना कधीच माफ करणार नाही"

सुहासिनी प्रभुगावकर
रविवार, 31 जानेवारी 2021

“बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला प्रत्येक क्षेत्रात मागे नेले आहे, त्यामुळे राज्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही”.

हावडा : “बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला प्रत्येक क्षेत्रात मागे नेले आहे, त्यामुळे राज्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही”, असं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी हावडा येथील भाजपाच्या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना म्हटलं. तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजीव बॅनर्जी, बैशली डालमिया, प्रबीर घोषाल, रथिन चक्रवर्ती आणि रुद्रनिल घोष हे काल हावडाच्या डुमरजाला स्टेडियममध्ये झालेल्या भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपा नेते दिलीप घोष आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यासह सहभागी झाले होते.

"प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान हा देशासाठी मोठा धक्का" 

पश्चिम बंगाल मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठीचे वारे सध्या जोमाने वाहू लागल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच जे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे, बंगाल आणि तृणमूल कॉंग्रेसला तुमची गरज नसल्याचे हुगळीतील पुरसुराच्या सभेत म्हटले होते. हावडा येथील भाजपाच्या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना तृणमूलचे सगळे नेते भाजपमध्ये येत आहेत, त्यामुळे निवडणुकीपर्यंत ममता एकट्याच पक्षामध्ये राहतील, असंदेखील गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

6 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावर

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवताना, नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रत्येकाचे नेते असल्याचे म्हटले आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी म्हणजे 23 जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियल मधील कार्यक्रमात घडलेल्या संदर्भात बोलताना, ते पंतप्रधानांसमोर मला त्रास देत होते. मात्र आपला विश्वास बंदुकीवर नसून राजकारणावर असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सभेत म्हटले आहे. याशिवाय भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आणि बंगालचा अपमान केला असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळेस केला. 

संबंधित बातम्या