West Bengal Elections 2021: भाजपमुळेच वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

West Bengal Elections 2021: भाजपमुळेच वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या
mamata banerjee dharna.jpg

कोलकाता: राज्यात विधानसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले असून मतदानाचे चार टप्पे आहेत. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये देखील वेगवगेळ्या राजकीय पक्षांकडून आयोजित प्रचारसभा आणि रॅली मध्ये लोक मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी, भारतीय जनता पक्षामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे असा आरोप  केला आहे. (Mamata Banerjee said the BJP was responsible for the increase in corona patients)

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील प्रचार सभेत उपस्थितांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांसाठी भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना "भाजप निवडणुकीत  प्रचार करण्यासाठी बाहेरील लोकांना घेऊन येत आहे आणि यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग होतो आहे असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे.  आणि संक्रमणाची गती असूनही, सर्व पक्ष मोठ्या प्रमाणात सभा घेतात, ज्यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. 

या सभेत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या २४ तास निवडणूक प्रचारावर बंदी घालण्याच्या निर्णयावर देखील टीका केली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर बोलताना 'हिंदू, मुस्लिम आणि इतरांना एकत्र मतदान करण्यास सांगणे चुकीचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक निवडणुकीत माझी खिल्ली उडविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारावर निवडणूक अयोग्य बंदी का घालत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com