''नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान यापूर्वी कधीही पहिला नाही''

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 मार्च 2021

देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. केरळ, तामिळनाडू, पश्चिमबंगाल, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या   पुद्दुचेरीमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धुराळा उडत आहे.

बिष्णुपूर: देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. केरळ, तामिळनाडू, पश्चिमबंगाल, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धुराळा उडत आहे. अशातच सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या धर्तीवर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळतेय.  पश्चिम बंगालच्या बिष्णुपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर पुन्हा निशाणा साधला. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये गुंड पाठवून येथील संस्कृती बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. (Mamata Banerjee said I have never seen a lying Prime Minister like Narendra Modi)

मी पंतप्रधान या पदाचा खूप आदर करते, परंतु नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी यापूर्वी कधीही पहिला नाही. ते केवळ खोटं बोलतात. अस म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या छळामुळे आज उत्तरप्रदेशातील आयपीएस अधिकारी आपल्या नोकऱ्या सोडत असल्याचा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. तसेच गुंड कोण आहेत? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला. तसेच बंगालची संस्कृती नष्ट करण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशातून गुंड आणत असल्याचा गंभीर आरोपही ममता यांनी यावेळी केला. 

Kumbh Mela 2021: न्यायालयाचा मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना मोठा झटका!

ममता बॅनर्जीं यांनी यावेळी शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारने अदानी समूहाला विकलेल्या कंपन्यांवरून देखील निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी रस्त्यावर आहेत. मात्र  शेतकऱ्यांना रस्त्यावरून चालताच येऊ नये यासाठी केंद्र सरकारनं रस्त्यावरच खिळे ठोकण्यात आल्याचे म्हटले.  त्यानंतर पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उद्योजक अदानी या तिघांचा गट आहे. व हा गट देशातील जनतेसाठी हानीकारण असून यात अदानी देशातील सर्व पैसा आणि उत्पादने लुटतील. तर लुटलेली ही सर्व संपत्ती पंतपधान मोदी, शहा आणि अदानी यांनाच खायला मिळेल. परंतु देशातील सामान्य जनता केवळ अश्रूच ढाळत बसेल, अशी घणाघाती टीका ममता बॅनर्जी यांनी केली.  

त्याचबरोबर, इंधन दरवाढीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी दिले का? असा सवाल विचारत त्या म्हणल्या की, जर त्यांनी 15 लाख दिले नाही तर त्यांना मतंही मिळणार नाहीत. याशिवाय केंद्राने बेटी पढाओ बेटी बचाओ योजनेअंतर्गत अद्याप एकही रुपया खर्च केला नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मात्र आपले सरकार मुलींना 1000-2500 रुपयांची शिष्यवृत्ती देते, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रचारसभाच्या रणधुमाळीत भाजपा आणि सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी चांगलीच चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. येत्या 27 मार्चपासून पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सुरु होत आहेत. आठ टप्प्यात या निवडणूका होणार असून 2 मे 2021  रोजी या निवडणुकांचा अंतिम निकाल लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

संबंधित बातम्या