West Bengal Election 2021: थेट निवडणूक आयोगाच्याच विरोधातच ममता बॅनर्जी यांचे आंदोलन

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

निवडणूक प्रचारावर 24 तास बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती.

निवडणूक प्रचारावर 24 तास बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मंगळवारी दुपारी 12:00 वाजता कोलकाता येथे दिवसभर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी काल आपल्या ट्विटर अकाउंटवर या संदर्भातली माहिती दिली होती. ( Mamata Banerjee seats on dharna against the decision of election commission )

Karnataka: लॉकडाऊन बद्दल मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती देताना, “निवडणूक आयोगाच्या लोकशाही आणि घटनाबाह्य निर्णयाच्या विरोधात आपण मंगळवारी सकाळी 12 वाजेपासून कोलकाताच्या गांधी मूर्ती येथे धरणे आंदोलन करणार आहे.” असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज निवडणूक आयोगाच्या विरोधात धरणे आंदोलन केले सुरु केले असल्याचे समजते आहे. केंद्रीय दलांविरोधात ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य आणि अल्पसंख्यांक समाजाबद्दल केलेल्या विधानाची दखल घेत सोमवारी रात्री 8 वाजेपासुन ते मंगळवारी रात्री 8:00 वाजेपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्याचे आदेश  निवडणूक आयोगाने दिले होते. निवडणूक आयोगाने केलेल्या या कारवाई नंतर ममता बॅनर्जी यांचा राग अनावर झाला असल्याचे पाहायला मिळते आहे. तर आज रात्री 8 नंतर ममता बॅनर्जी या दोन प्रचार सभांना संबोधित करणर असल्याचे समजते आहे.  

हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे बोलत असताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अल्पसंख्यांक समुदायाने आपले मतदान फुटू देऊ नये अशा आशयाचे विधान केले होते, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करत ममता बॅनर्जी यांच्या कारवाई करण्याची मागणी  केली होती. दरम्यान, बंगालमध्ये सुरु असलेल्या निवडणुकांच्या एकूण 8  टप्प्यांपैकी 4  टप्पे पूर्ण झाले असून उर्वरित चार टप्प्यांचे मतदान झाल्यानंतर 2 मी रोजी या निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. 

संबंधित बातम्या