जखमी वाघीण घातक ठरेल असे म्हणत ममता बॅनर्जींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

पश्चिम बंगाल मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

पश्चिम बंगाल मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पायाला झालेल्या जखमेवर उपचार घेऊन पुन्हा प्रचार सभांना सुरुवात केल्यांनतर ममता बॅनर्जींनी मेजियामध्ये झालेल्या प्रचार सभेत केंद्र सरकारला धारेवर धरले. "तुम्ही वाघीणीला जखमी केले, मात्र जखमी वाघीण जास्त घातक असते", असे म्हणत भारतीय जनता पक्षाला त्यांनी खुलं आव्हान दिल आहे. भारतीय जनता पक्ष लोकांचा आवाज दाबण्यासाठीच षडयंत्र करत असल्याचा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ ही खेदजनक - अर्थमंत्री निर्मला सीतारमण 

ममता बॅनर्जी यांनी आज भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवताना, भाजपकडे समर्थक नसल्याने सभेत गर्दी वाढवण्यासाठी त्यांच्यावर भाडोत्री लोक आणण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय त्यांनी माझ्यावर हल्ला करून आपल्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. मात्र जखमी वाघीण ही जास्त घातक असते. व आज आपण एका पायावर ही लढाई लढत असले तरी आपल्या मागे आई आणि मुलगी या आधार बनून उभ्या असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच भारतीय जनता पक्षाने कितीही त्रास दिला तरी आपण मागे हटणार नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यानंतर ही लढाई जखमी अवस्थेत सुद्धा लढत आहे आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा येणाऱ्या २७ तारखेला ही लढाई लढावी लागणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.  

नरेंद्र मोदींना देश चालवता येत नाही; ममतांनी डागली तोफ

याव्यतिरिक्त, गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्याकडे इशारा करत, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कारवाया या षडयंत्राचाच भाग असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. मात्र त्यांना जर वाटत असेल की दबाव आणून ते आम्हाला घाबरवून थांबवू शकतील तर असे होणार नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. या सभेत ममता बॅनर्जीनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत त्यांनी,"जो मुझसे टकरायेगा, चूर चूर हो जायेगा", ''हरे कृष्णा हरे हरे तृणमूल काँग्रेस घोरे घोरे'' अर्थात तृणमूल काँग्रेस सदनात जाईल, अशा घोषणा दिल्या. या सर्व घटनांमधून बंगालची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 

संबंधित बातम्या