ममता बॅनर्जी देणार 5 रुपयांत जेवण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

'5 रुपयांत जेवण देणारी मॉं कॅंटीन योजनेची घोषणा केली आहे.' पहिल्या टप्प्यात कोलकत्त्यामधील 16 ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल आगामी काळात विधानसभा निवडणूका होणार आहेत. बंगालचं राजकिय वातावरण भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी चांगलच तापलं आहे. यातचं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकत्यात एक मोठी घोषणा केली आहे. '5 रुपयांत जेवण देणारी मॉं कॅंटीन योजनेची घोषणा केली आहे,' पहिल्या टप्प्यात कोलकत्त्यामधील 16 ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे. जिथे कमीतकमी एक हजारपेक्षा अधिक लोकांना दुपारचे जेवण मिळेल अशी सोय करण्यात आली आहे.

''ज्या प्रकारे आपली आई आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रेमाने जेवण देते. त्याचप्रकारे मॉं योजनेमधून गरजू लोकांना जेवण देण्यात येणार आहे. या जेवणामध्ये डाळ, भात,भाजी,चपाती, अंड्याचा रस्सा हे पदार्थदिले जाणार आहेत,'' असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

अशाप्रकारची योजना यापूर्वी तामिळनाडूमध्ये जयललिता मुख्यमंत्री असताना राबवण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रात शिवभोजन थाळी देणारी योजना देखील राबवण्यात आली आहे. याच धर्तीवर ममता यांनी बंगालमध्ये राज्यातील गरजू लोकांना अन्न मिळावे यासाठी  ही योजना सुरु करण्यात आली  आहे. मात्र विरोधकांनी ममता बॅनर्जी या निवडणूकीच्या पुढे अशा योजनेच्या घोषणा करुन राजकिय स्टंट बाजी करत आहेत.

'शिवभोजन' थाळीच्या धर्तीवर ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगाल मध्ये ‘माँ...

तर, दुसरीकडे या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 करोड रुपायांची घोषणा करण्यात आली आहे. लोकांना या जेवणासाठी पाच रुपये देणार आहेत तर उर्वरित 15 रुपयांचा अधिभार राज्यशासन उचलणार आहे. लवकरच कोलकत्यामधील सर्व स्थानिक शहरी भागात दुपारी 1 ते 3 यावेळेत मॉं कॅंटीन सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही योजना हळूहळू कोलकत्याच्या बाहेर ही योजना सुरु करण्य़ाचा प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगण्य़ात येत आहे.  
 

संबंधित बातम्या