मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यावरुन ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांग्लादेश दौरा हा निवडणुकांच्या आचारसंहितेचा भंग करतो.

कोलकाता: पंतप्रधान  मोदी बांग्लादेशच्या 50  व्या वर्धापन दिनानिमित्त बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी बांग्लादेश दौऱ्यात बोलताना एक विधान केलं होतं. 'बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यालढ्यातही मी माझ्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झालो होतो.'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या बांग्लादेश दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांग्लादेश दौरा हा निवडणुकांच्या आचारसंहितेचा भंग करतो. ममता बॅनर्जी यांनी शनिवारी खडगपूर येथील मोर्चाला संबोधीत करताना म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेश दौऱ्यावर जातात आणि बांगला भाषेत भाषण देतात. हे निवडणूकीच्या आचारसंहितेच पूर्ण उल्लंघन आहे. (Mamata Banerjees attack on Modis Bangladesh tour)

शनिवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्य़ावर गेले आहेत. बांग्लादेशचे नायक शेख मुजीबर रहमान यांच्या समाधीस्थळाला मोदी यांनी भेट देऊन पुष्पाजंली वाहीली. शेख मुजीबुर रहमान यांच्या समाधी स्थळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

भाजपा आसाममधील जनतेत धर्म आणि भाषेच्या मुद्द्यावरून फुट पाडत आहे : मनमोहन सिंग 

ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यावर दाढी वाढवण्यावरुन कटाक्ष केला होता. त्यांनी म्हटले होते की, ‘’त्यांच्या दाढीची वाढ ही अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या बरोबर उलट झाली आहे.’’ मोदीनीपूर जिल्ह्यात ममता बॅनर्जी यांनी भाजपला, ‘’सर्वात मोठा फसवणूक करणारा पक्ष’’ म्हणून संबोधीत केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्य़ावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी ढाकामध्ये बोलत असताना बांग्लादेशच्या स्वातंत्र्यालढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. ‘’बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी झालो होतो, त्यावेळी मला अटकही झाली होती आणि तुरुंगातही जावं लागलं होतं,’’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
 

संबंधित बातम्या