भाजप विरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे; सोनिया गांधींसह विरोधी पक्षांना ममता बॅनर्जी यांचे पत्र
mamta banerjee letter.jpg

भाजप विरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे; सोनिया गांधींसह विरोधी पक्षांना ममता बॅनर्जी यांचे पत्र

तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी आणि विरोधी पक्षातील अन्य नेत्यांना एक पत्र लिहिले आहे. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर करत असलेल्या हल्ल्यांविरूद्ध एकत्र संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी या पत्रात लिहिले असल्याचे समजते आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका सुरु असताना ममता बॅनर्जी यांनी हे पत्र लिहिले आहे. (Mamata Banerjee's letter to opposition parties)

सात पानांच्या या पत्रात ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. लोकशाही आणि राज्यघटनेवरील 'हल्ल्या' विरूद्ध भाजप करत असलेल्या कारस्थानांच्या विरोधात एकत्रितपणे आणि प्रभावीपणे लढा देऊन, देशातील जनतेच्या मनात   विश्वास निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. केंद्राच्या प्रतिनिधीला अधिकार देणाऱ्या नॅशनल टेरिटरी कायदा 2021 या  कायद्याला देखील त्यांनी विरोध केला आहे. 

केंद्रशासित प्रदेश आणि भारतीय जनता पक्षव्यतिरिक्त इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत, भाजप राज्यपालांच्या पदाचा गैरवापर करून  त्या त्या राज्यातील  सरकारसाठी जाणीवपूर्वत समस्या निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी या पत्रात केला आहे. तसेच, नॅशनल टेरिटरी विधेयक मंजूर करणे ही गंभीर बाब असून, या कायद्याच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारची सर्व शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा उल्लेख देखील ममता बॅनर्जी यांनी या पात्रात केला आहे. 'नॅशनल टेरिटरी कायदा 2021' वर शंका उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी असे लिहिले की, "उपराज्यपाल गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्या प्रॉक्सी म्हणून काम करणारे दिल्लीचे अघोषित व्हायसरॉयच बनले आहेत."

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, एआयडीएमकेचे स्टॅलिन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी, बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक, तेलंगणा राष्ट्र समिती चे चंद्रशेखर राव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तरुण नेते तेजस्वी यादव आणि आम आदमी पार्टी संयोजन अरविंद केजरीवाल यांनाही ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) बॅनर्जींकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com