ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीला सीबीआयची नोटीस   

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

अवैध कोळसा खाण आणि तस्करी प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार व तृणमूल कॉंग्रेसचे युवा अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे.

अवैध कोळसा खाण आणि तस्करी प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार व तृणमूल कॉंग्रेसचे युवा अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. आज दुपारी सीबीआयचे अधिकारी कालिघाट परिसरातील अभिषेक बॅनर्जी यांच्या शांतिनिकेतन येथे दाखल होत, त्यांनी अवैध कोळसा खाण आणि तस्करी प्रकरणाबाबत अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस दिली आहे. 

काही दिवसांपूर्वीच सीबीआयच्या पथकाने अनूप मांझीशी संबंधित प्रकरणावर झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी छापे टाकले होते. व त्यानंतर या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची भूमिका समोर आली होती. त्यामुळे सीबीआयचे पथक आज अभिषेक बॅनर्जी यांच्या शांतिनिकेतन येथील निवासस्थानी दाखल होत त्यांनी नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय, सीबीआयचे पथक आजच रुजीरा बॅनर्जी आणि त्यांच्या बहीण यांच्याशी चौकशी करण्याच्या इराद्याने दाखल झाल्याचे समजते. पश्चिम बंगाल राज्यात एप्रिल महिन्याच्या सुमारास विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आणि आता या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय तापमानाचा पारा देखील चांगलाच तापू लागलेला आहे.  

रँचोच्या 'सोलर हिटेड मिलिट्री टेन्ट'वर आनंद महिंद्रा फिदा; केले ट्विट...

दरम्यान, मागील काही काळापासून तृणमूल कॉंग्रेस पक्षात अभिषेक बॅनर्जी यांचा प्रभाव झपाट्याने वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 2019 मध्ये डायमंड हार्बर येथील लोकसभेची जागा लढवत त्यांनी निवडणूक जिंकली होती. व आता 2021 मध्ये ते तृणमूल कॉंग्रेसचे मुख्य रणनीतिकार बनले आहेत. त्यानंतर आज अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीला सीबीआयने नोटीस बजावत कोळसा घोटाळा प्रकरणात चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे.  

संबंधित बातम्या