भर उन्हात नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जीचा 'खेला होबे'

भर उन्हात नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जीचा 'खेला होबे'
mamata.jpg

पश्चिम बंगालची निवडणुक प्रचारसभा शिगेला पोहचली आहे. याठिकाणी सर्वांचे लक्ष हॉटसीट असलेल्या नंदीग्रामकडे लागले आहे. याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी त्यांच्या विरोधात मैदानात उभे आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी सुवेंदु अधिकारी यांनी या जागेवर दावा केला आहे. तर ममता बॅनर्जी यांनादेखील ही जागा जिंकण्यात कोणतीही कमतरता सोडायची इच्छा नाही. यामुळे होळीच्या दिवशी ममता कडक उन्हातही नंदीग्राममध्ये रोड शो केला. 

पश्चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान 1 एप्रिल रोजी होणार असून त्यामध्ये नंदीग्राम जागेवरही मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नंदीग्राममधील जनतेला संबोधित केले. ''जर तुम्ही भाजपाला मतदान केले तर ते  गुंड पाठवून तुम्हाला बंगालमधून बाहेर काढतील आणि त्याठिकाणी स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करतील. मात्र तुम्ही आतापर्यंत तृणमूल कॉंग्रेस ल मदान केले, तुम्हाला मोफत रेशन मिळेल, जे थेट तुमच्या घरापर्यंत येईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरूनही भाजपावर निशाणा साधला. शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. भाजपला त्यांच्या जमिनी लुटायच्या आहेत. तुम्ही त्यांना मतदान करू नका, अन्यथा ते इथेही असेच करती, पश्चिम बंगालची लूट होऊ देऊ नका, भाजपाला मतदान करू नका, असे आवाहन यावेळी ममता बॅनर्जी यांनी केले. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पायल दुखापत झाली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी व्हील चेअरवरूनच अनेक प्रचारसभांना हजेरी लावली.  प्रचंड ऊन असल्याने त्यांनी डोक्याला एक पांढरा कपडा गुंडाळला होता.  मात्र रोड शोचा मार्ग अचानक बदलत ग्रामी भागाकडे आपला मोर्चा वळवत गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी नियोजित ठिकाणी प्रचारसभेला उपथित राहत जनतेला संबोधित केले. ममता बॅनर्जी यांच्यासह भाजप नेते बाबुल सुप्रियो टोलीगंजमध्ये प्रचार केला. तर उद्या 30 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नंदीग्राममध्ये येणार आहेत.  त्यामुळे उद्या अमित शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 30 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपणार असून येत्या 1 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये 30 जागांवर मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी या सर्व निवडणुकांचा निकाल लागणार आहे. 

Related Stories

No stories found.