निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा दुचाकी प्रवास

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

आम्ही इंधन दरवाढीच्या विरोधात अंदोलन करत आहोत. केंद्र सरकार फक्त आश्वासने देत आहे.

कोलकाता : आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच विधानसभा निवडणूकांच्या तारखाही जाहीर करेल. दरम्यान बंगालमधील राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशात गेल्या काही दिवसांत गगनाला भिडलेल्या पेेट्रोल आणि डिझेल किमतीमुळे मोदी सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी गुरुवारी इंधन दरवाढीच्या विरोधात स्कूटरवरुन प्रवास करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी हजारा मोरे ते राज्य सचिवालय असा 5 कि.मी. चा प्रवास केला. यावेळी बंगाल सरकारमधील राज्यमंत्री फिरहद हकिम यांच्यामागे बसून ममता बॅनर्जी यांनी स्कूटरवरुन प्रवास केला. नबन्नामध्ये पोहचल्य़ानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘’आम्ही इंधन दरवाढीच्या विरोधात अंदोलन करत आहोत. केंद्र सरकार फक्त आश्वासने देत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आणि सध्याच्या काळातील पेट्रोल- डिझेलच्या किमती यातील तुम्ही फरक जाणून घ्या. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देश विकाला काढत आहेत. हे सरकार लोकविरोधी आहे,’’ असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

मोदी स्टेडियमवरुन हार्दीक पटेंलचा भाजपवर हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्य़े पेट्रोल 92.12 आणि डिझेल 84.20 प्रतिलीटर आहेत. बंगालमधील सर्वसामान्य़ांना दिलासा देण्यासाठी ममता बॅनर्जी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात एक रुपयाची कपात करण्याची घोषणा केली आहे.  

 

संबंधित बातम्या