कोरोनाचे कारण सांगत ममता सरकारने केंद्रीय आयोगाच्या दौऱ्याला दिला नकार

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

दलितांवर अनेक ठिकाणी अत्याचार झाले असल्याच्या तक्रारी आमच्या पर्यंत आल्या असल्याचे आयोगाने सांगितले होते.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसा (Violence) झाली आहे. या घटनांमध्ये दलितांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) दौरा करणार आहे. मात्र आता पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाचे कारण समोर ठेवत हा दौरा रद्द करण्यास सांगितले आहे. सरकारने यासाठी कोरोना प्रोटोकॉलचे कारण दिले असल्याचे समजते आहे. तसेच ८ मी पासून राज्यात हिंसाचाराचे कोणतेही प्रकरण झाले नसल्याचे पश्चिम बंगाल सरकारने कोलकाता उच्च न्यायालयात सांगितले आहे.( The Mamata government refused to visit the Central Commission, citing Corona's reasons)

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात विधानसभेच्या निवडणूक झाल्या आणि २ मी रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. २ मे पासून राज्यात दलितांवर अनेक ठिकाणी अत्याचार झाले असल्याच्या तक्रारी आमच्या पर्यंत आल्या असल्याचे सोमवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने न्यायालयात सांगितले होते.याच अनुशंघाने आयोगाने १३ आणि १४ मे रोजी राज्यातील २४ जिल्ह्यात दलितांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी दौरा निश्चित केल्याची माहिती  मिळाली होती. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती अयोग चीफ सेक्रेटरी आणि डीजीपी यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते. 

"सरकार सकारात्मकतेच्या नावाखाली खोटा अजेंडा चालवते आहे"

दरम्यान, केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाला राहण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये रम बुक केल्या होत्या, त्या रूमचे बुकिंग सुद्धा रद्द झाले असल्याचे समजते आहे. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय संपला यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. 

संबंधित बातम्या