ममतांचा मतदारांना अजब सल्ला; भाजपचे नेते पैसे देतायेत ते घ्या पण...

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

त्यांच्याकडून पैसे घ्या मात्र त्यांना मतदान करु नका. हा तुमचाच पैसा आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका 8 टप्प्यांमध्ये पार पडत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये महिनाभर प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. यामध्य़े रंगतदार सामने तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये होताना पहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होण्यापासून भाजपनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. ममता बॅनर्जी  या सुध्दा भाजपच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहेत. नुकताच ममता बॅनर्जी यांनी भाजपने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना बंगालमधील मतदारांना अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, पण ममता बॅनर्जी यांनी विरोधकांनाही जोरदार टोला लगावला आहे.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर पैसा वाटण्याचा आरोप केला. ‘’सुकमामध्ये 21 जवान शहीद झाले. मात्र भाजपचे बडे नेते कोट्यावधी रुपये घेऊन बंगालमध्ये ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी लोकांना निवडणुकांच्या आधी पैसे देण्याचं वचन दिलं आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या मात्र त्यांना मतदान करु नका. हा तुमचाच पैसा आहे. ते किती खोटे बोलतात ते तुम्ही पाहीलं आहे. 15 लाखापैकी एक पैसा लोकांच्या खात्यात जमा झाला नाही,’’ असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. (Mamatas strange advice to voters Take what the BJP leaders pay but) 

West Bengal Election 2021: ''पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट'...

''गुंडगिरी करुन कोणत्याही प्रकारे निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी मन, बुध्दी आणि लोकांचा पाठिंबा असणं आवश्य़क आहे. किती लोकांना तुम्ही घाबरावल?  गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आले होते, मात्र त्यांच्या बैठकीला कोणीही आले नव्हते. मग ते दिल्लीला गेले आणि तेथे त्यांनी बैठक घेतली. तुम्हाला देशाची लोकशाही संपवायची आहे का?,’’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या