West Bengal Election : 'जखमी वाघीण' खेळतेय फुटबॉल; पाहा व्हिडिओ

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

होवरा येथे ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या एका कृतीमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. पहिल्या टप्प्या नंतर बंगालच्या एकूण 294 जागांपैकी 1 एप्रिल रोजी पुढच्या 30 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या दुहेरी लढतीमुळे या निवडणुकीत रंगत आलेली पाहायला मिळते आहे. यातच हावडा  येथे ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या एका कृतीमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या  यातच हावडा  येथे ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या एका कृतीमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. (Mamta Banerjee Playing Football during Public Rally  )

West Bengal : भाजपा उमेदवार अशोक दिंडाच्या गाडीवर हल्ला; टीएमसी समर्थकांवर आरोप

ममता बॅनर्जी सध्या पश्चिम बंगाल निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार करत आहेत. जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्या व्हील चेअर वरून प्रचार रॅली मध्ये सभागी होताना दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्षातील (BJP) केंद्राचे दिग्गज नेते पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी दंड थोपटून मैदानात उतरलेले दिसत आहेत. तर  "खेला होबे" म्हणत ममता बॅनर्जी यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगलेच आव्हान दिलेले पाहायला मिळते आहे. यातच हावडा येथे प्रचार सभे दरम्यान ममता बॅनर्जींनी (Mamta Banerjee) हातात फुटबॉल घेऊन खेळत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ मध्ये ममता बॅनर्जी या व्यासपीठावर व्हील चेअर वर बसून हातात फुटबॉल घेऊन काही वेळ तो खेळतात आणि नंतर समोर उपस्थित लोकांकडे फेकताना दिसत आहेत. 

पश्चिम बंगालच्या (West Bengal) पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या (Assembly Elections) 30 जागांसाठी मतदान झाले होते. या 30 जागांपैकी 27 जागांवर आम्हाला यश येईल असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भारतीय जानता पक्षाचे नेते अमित शाह यांनी व्यक्त केले होते. 294 जागांसाठी तब्बल 8 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांचे 2 मी रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत.    
 

संबंधित बातम्या