Watch Video: दुचाकीने वृद्ध व्यक्तीला रस्त्यावरून फरफटत नेले, थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

सध्या या व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Bengluru Video
Bengluru Video Dainik Gomantak

कर्नाटकातील बेंगळुरूमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. स्कूटरवरून जात असलेल्या तरुणाने एका वृद्ध व्यक्तीला स्कूटरवरून रस्त्यावर फरफटत नेले. वृद्ध व्यक्ती 70 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वृद्धाला स्कूटीवरून ओढल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, या तरुणाला रस्त्यावरील लोकांनी बेदम चोप दिला. त्यानंतर त्या तरूणाला देखील रुग्णालयात दाखल करावे लागले.

Bengluru Video
Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न, पाकिस्तानमधील राहते घरही बदलले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील मागदी रोडवर ही घटना घडली. वृद्धाला स्कूटरने रस्त्यावर ओढणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाविरुद्ध गोविंदराज नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या तो रुग्णालयात असून, उपचारानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

Bengluru Video
Covid-19 प्रिकॉशनरी डोस घेतला का? गोव्यात 11 ठिकाणी सोय, जाणून घ्या तुमच्या येथे कोठे मिळेल मोफत लस

दरम्यान, तरुण एका वृद्धाला स्कूटीने ओढत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पाहिल्यावर इतर वाहनधारकांनी त्याला अडवले. त्यानंतर तरुणाला खूप चोप देण्यात आला. काही लोकांनी वृद्धाला स्कूटीवरून ओढत नेल्याच्या घटनेचा व्हिडिओही शूट केला.

Bengluru Video
Arvind Kejriwal: 'मला दिल्लीच्या जनतेने निवडून दिले, तुम्ही कोण...'; एलजींवर भडकले केजरीवाल

मुथप्पा असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. 'दुचाकी चालकाचे नाव साहिल असून, त्याने माझ्या चारचाकीला मागून धडक दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. फोनवर बोलत तो गाडी चालवत होता. त्याने थांबून माफी मागितली असती तर मी त्याला जाऊ दिले असते, पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मी त्याची स्कूटी पकडली, तरीही त्याने गाडी थांबवली नाही आणि मला ओढून नेले. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.' असे पीडित मुथप्पा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com