''माणूस स्वत:चा बचाव करु शकणार नाही'' मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांनी देवाचा केला धावा

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 30 मे 2021

मानव स्वत:चा बचाव करु शकत नाही. आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे.

 देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) वाढू लागला असताना मोठ्या संख्येने रुग्णवाढ आणि मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यामधील (State) कोरोनाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. सगळी राज्ये आणि स्थानिक आरोग्य प्रशासन (Local health administration) आपल्याला जमेल तशी कोरोनाची स्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दुसरीकडे मेघालयमध्ये (Meghalaya) परिस्थिती बरीच वेगळी दिसत आहे. (Man cannot defend himself Meghalayas health minister called on God)

मेघालयमधील राज्य सरकार कोरोनाच्या परिस्थितीसमोर हतबल झाल्याचं सूचित करणारं वक्तव्य मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक (Alexander Lalu Heck) यांनी केलं आहे. ''माणूस स्वत:चा बचाव करु शकणार नाही. आता आपल्याला देवाच्या मदतीची, तसेच त्याच्या आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपलं कोणीचं नाही,'' असं वक्तव्य आरोग्यमंत्री अलेक्झांडर हेक यांनी केले आहे. ते एवढ्यावरचं थांबले नाही तर 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सगळ्यांनी आपआपल्या घरी आपआपल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केले आहे. मेघालय सरकारनं (Government of Meghalaya) त्यासंदर्भात परिपत्रक सुध्दा काढलं आहे. 

आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह

देशभरात कोरोनाचा संसर्ग जाणवत आहे. देशातील सध्याचे कोरोना आकडे चिंता वाढवत आहेत. मागील चोवीस तासात देशभरात 1 लाख 73 हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर दुसरीकडे 3 हजार 617  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच पाश्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा कोरोनाला हारवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत.

केंद्राकडून राज्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळणार नाही; जाणून घ्या कारण

दरम्यान, मेघालयमध्ये कोरोनाची स्थिती बिघडत चालली असताना मेघालय सरकारने त्यावर अजबच उपाय शोधून काढला आहे. 30 मे रोजी मेघालयमध्ये दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व धर्मीयांना आपआपल्या घरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी देवाची प्रार्थना करण्यास सांगण्यात आले आहे. त्याविषीयीचं परिपत्रक सुध्दा मेघालय सरकारने काढले आहे. मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी ही कल्पना मांडली असून त्याला मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरेड संगमा (Chief Minister Conrad Sangma)आणि मेघालय भाजपने देखील परवानगी दिली आहे. 

आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या कल्पनेविषयी देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे. आरोग्यमंत्री म्हणतात, ''मानव स्वत:चा बचाव करु शकत नाही. आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे. देवाशिवाय आपण काहीच करु शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एक कुटुंब म्हणून 30 मे रोजी बरोबर 12 वाजता देवाची प्रार्थना करायची आहे. जगभरात कोरोनाचा सामना करणाऱ्यांना फक्त पवित्र संरक्षणचं वाचवू शकेल''.

संबंधित बातम्या