Rajasthan: पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पॉक्सो कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

 झुंझुनू जिल्ह्यातील पाच वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यास पॉक्सो कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

झुंझुनू: जिल्ह्यातील पाच वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यास पॉक्सो कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. असा गंभीर गुन्हा करूनही दोषींना एकदाही पश्चात्ताप झाला नाही, अशी प्रतिक्रिया कोर्टाने याप्रकरणी दिली. झुंझुनुनमधील ही दुसरी फाशीची घटना आहे. 

राजस्थानमध्ये बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये हा निर्णय मोठा ठरू शकतो. झुंझुनू जिल्ह्यात पाच वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यास पोस्को कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, इतके वाईट कृत्य, गुन्हा केला असूनही दोषीला  एकदाही पश्चाताप झाला नाही. अशा नराधमांना फाशी देण्यात यावी. अशा प्रतिक्रिया स्थनिक लोकांकडून  येत आहे.

40 साक्षीदार आणि 250 कागदपत्रे

त्यांच्या दुष्कर्मांमुळे प्रश्नाच्या भोवऱ्यात आलेल्या पोलिसांनी या प्रकरणात कौतुकास्पद काम केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी बलात्काराची घटना घडली आणि पोलिसांनी नऊ दिवसांत कोर्टात चालान सादर केले. पोलिसांनी बलात्काऱ्याविरूद्ध कठोर केस फाईल केली, यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अशा अल्पावधीत पोलिसांनी पुरावे म्हणून 40 साक्षीदार आणि सुमारे 250 कागदपत्रे सादर केले.

मैदानावर खेळत असेलेल्या पाच वर्षीय निरागस मुलीला आरोपी सुनील कुमारने  आमिष दाखवत तीला स्कूटीवर सोबत घेऊन गेला. त्या मुलीच्या भावंडांनी आरोपीचा पाठलाग केला पण त्याला पकडता आले नाही. पोलिसांना माहिती दिल्यानंतर एसपी मनीष त्रिपाठी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास, पिडीत मुलगी गाडाखेडा गावात वाईट अवस्थेत आढळली.

गाडखेडा चौकीचे प्रभारी शेरसिंह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने तीला जयपूरला नेण्यात आले होते. घटनेच्या पाच तासानंतरच पोलिसांनी शाहपूर येथील रहिवासी आरोपी सुनील याला अटक केली.  आरोपींविरोधात 9व्या दिवशी 1 मार्च ला चलन सादर करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होती. बुधवारी पोक्सो कोर्टाचे न्यायाधीश सुकेश कुमार जैन यांनी आरोपी सुनीलला फाशीची शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या