कुटुंबासाठी पठ्ठ्याने चक्क बिबट्याला केले ठार; कर्नाटकातील घटना

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात एका व्यक्तीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटूंबावर हल्ला केलेल्या एकाने बिबट्याचा गळा आवळून त्याला ठार केलं.

बेंगळुरू : कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात एका व्यक्तीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटूंबावर हल्ला केलेल्या एकाने बिबट्याचा गळा आवळून त्याला ठार केलं. स्थानिक वृत्तानुसार, बंगळुरुपासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आर्सीकेरे तालुक्यातील बेंडेकेरे गावात राहणारे राजगोपाल नाईक हे मोटारसायकलने पत्नी व मुलासह घरी परत जात होते. त्यावेळी अचानक झुडूपांमधून बिबट्या बाहेर आला, व त्याने मोटरसायकलवर उडी घेतली. बिबट्याने राजगोपाल नाईक यांच्या मुलाच्या पायाचा चावा घेत पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा दुचाकी प्रवास

बिबट्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजगोपाल नाईकांवर बिबट्याने जोरदार हल्ला चढवला. या परिस्थितीतही राजगोपाल यांनी धाडस दाखवत त्याच्या गळ्यास पकडून त्याच्या डोक्यावर वार केले . ही लढाई सुरू असताना बिबट्याने मुक्त व्हायचा प्रयत्न केला आणि एकदा त्याने राजगोपाल यांच्यावर झेप घेतली. राजगोपाल यांनी बिबट्याच्या मानेला घट्ट पकडले आणि शेवटी गुदमरल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. या लढ्यात राजगोपालच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर अनेक जखमा झाल्या.

ड्रॅगनच्या कुरघोडीवर भारताने केलेल्या 'या' चालीमुळेच सीमावाद निवळला 

काही सेकंदातच आजूबाजूला बघ्यांची गर्दी झाली, व जखमी राजगोपाल यांच्या समोर मृत्यूमुखी होऊन पडलेला बघून, लोक आश्चर्यचकित झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. ‘नेटिझन्स’ने राजगोपालला‘ रिअल-लाइफ जॉर्ज कुट्टी ’म्हणून संबोधले आहे. र्ज कुट्टी हे द्रष्यम 2 या चित्रपटातील एक पात्र आहे. .वन उपवनसंरक्षक (हसन विभाग) के एन बसवराज यांनी या घटनेची माहिती दिली. 
 

संबंधित बातम्या