Manipur Landslide: आर्मी कॅम्पजवळ भूस्खलन; 6 जणांचा मृत्यू, 30 बेपत्ता

मणिपूरमध्ये लष्कराच्या कॅम्पजवळ दरड कोसळली आहे.
Manipur
ManipurTwitter/ @ANI

Manipur Landslide : मणिपूरमध्ये लष्कराच्या कॅम्पजवळ दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात हे भूस्खलन झाले आहे. तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भारतीय लष्कराच्या 107 प्रादेशिक सैन्याचा कॅम्प होता. लँड स्लाईडमध्ये त्या ठिकाणाचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, टेरिटोरियल आर्मीने सध्या त्यांच्या दोन लोकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तर 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मुलासह पाच जण बेपत्ता असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले आहे. यासोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांचे 6-7 लोकही बेपत्ता आहेत.

Manipur
3 वर्षानंतर अमरनाथ यात्रा सुरू, यात्रेकरूंची पहिली तुकडी मंदिराकडे रवाना

दुसरीकडे, भूस्खलनानंतर मणिपूर (Manipur) सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री एन बिरेन (N. Biren Singh) सिंह यांनी भूस्खलनाची माहिती घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. सध्या तिथे मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. सीएम बिरेन सिंह यांनी सांगितले की, 'या भागात रुग्णवाहिका आणि डॉक्टर पाठवण्यात आले आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com