मन की बात : "पारसापेक्षाही पाणी महत्त्वाचे, पाण्याचे संवर्धन करा"

मन की बात : "पारसापेक्षाही पाणी महत्त्वाचे, पाण्याचे संवर्धन करा"
Mann Ki Baat P M Modi embraced the importance of conserving water

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या  रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना जलसंधारणावर भर दिला. हा त्यांचा 74 वा मन कि बात संवाद होता. ज्यात जल संवर्धनाचा आग्रह धरण्याचे आवाहन करताना, "पाणी आमच्यासाठी जीवन तसेच श्रद्धा आहे. पाणी हा विकासाचा प्रवाह आहे.", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पाणी हे पारसपेक्षा महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की पारसाच्या स्पर्शाने लोखंड सोन्यात रूपांतरित होते. त्याचप्रमाणे, जीवनासाठी पाण्याचा स्पर्श असणे अनिवार्य आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, जगातील प्रत्येक समाजात नदीशी संबंधित एक परंपरा आहे. नदीकाठावरही बर्‍याच संस्कृती विकसित झाल्या आहेत. 

मन की बात मध्ये जलसंधारणावर जोर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जागतिक जल दिन' काही दिवसांत म्हणजेच 22 मार्चला आहे. मित्रांनो, एक काळ असा होता की गावात विहिरी, तवा, या सगळ्याचं संगोपन गावातले सगळे लोक मिळून करायचे." तामिळनाडूच्या तिरुअननामलाईमध्ये सुरू असलेल्या अशाच प्रयत्नांना दाखला त्यांनी यावेळी दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज राष्ट्रीय विज्ञान दिन देखील आहे. हा दिवस भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही. रमणजींनी लावलेल्या 'रमन इफेक्ट' शोधासाठी समर्पित आहे. ज्याप्रकारे आपल्याला जगातील इतर शास्त्रज्ञांबद्दल माहिती असते, त्याचप्रकारे आपल्याला भारताच्याही शास्त्रज्ञांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येक जण देशाचा अभिमान बाळगतो, प्रत्येक देशवासीय सामील होतो, तेव्हा स्वावलंबी भारत केवळ आर्थिक मोहिमेऐवजी राष्ट्रीय आत्मा बनते."

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आपला निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे. त्याअंतर्गत गृहमंत्री अमित शहा काल रात्री उशिरा तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे पोहोचले. भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा आज तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com