धक्कादायक! देशात 24 तासांत आढळले कोरोनाचे तब्बल 'इतके' रुग्ण  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 मार्च 2021

कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे देशात पुन्हा मागील वर्षा सारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे देशात पुन्हा मागील वर्षा सारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धक्कादायक म्हणजे तीन महिन्यानंतर प्रथमच देशात 24 तासांत तब्बल 35,000 जण कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. 

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य अन फाटक्या जीन्स आल्या...

देशातील महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि पंजाब  या राज्यांना कोरोनाच्या प्रभावामुळे अंशतः लॉकडाऊन सारखे महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले आहेत. गुजरातमधील वाढती प्रकरणे लक्षात घेता अहमदाबादची सर्व मैदाने आणि उद्यान पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी आजपासून बंद ठेवण्यात आली आहेत. तर, पंजाबमध्ये आता रात्री 9 ते पहाटे 5 या काळात नाईट कर्फ्यू लागू असेलकरण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोरोनाचे वाढती प्रकाराने लक्षात घेता लुधियाना, जालंधर, पटियाला, मोहाली, अमृतसर, गुरदासपूर, होशियारपूर, कपूरथला आणि रोपार जिल्ह्यात अंशतः लोकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

चालकांनो सावधान! टोल भरताना फास्टॅग नसल्यास दाखल होणार गुन्हा

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आज एका लोकप्रिय रेस्टोरंट विरोधात गुन्हा नोंदविला आहे. बीएमसीच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी परिसरातील ओबर-जिन प्लेट्स आणि पोर्स रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला. आणि मास्क न घातलेल्या 245 लोकांकडून 19,400 रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळेस कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने चालवले जात असल्याचे सांगितले. शिवाय, यावेळी ग्राहकांनी मास्क घातलेले नव्हते, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

 

संबंधित बातम्या