Goodbye Lata Didi: 'भारतीय संस्कृतीच्या स्वरलतांना येणारी पिढी स्मरणात ठेवेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Lata Mangeshkar Passes Away
Lata Mangeshkar Passes AwayDainik Gomantak

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे, गान कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास (Lata Mangeshkar Passes Away) घेतला आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Lata Mangeshkar Passes Away
जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे निधन

पीएम मोदींनी ट्विट केले की, 'मी माझ्या वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही. दयाळू लता दीदी आपल्याल सोडून गेल्या. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरून काढता येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीचा एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अद्भुत क्षमता होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, 'स्वर कोकिळा' लता मंगेशकर यांच्या निधनाने भारताचा आवाज हरवला आहे. लताजींनी स्वर आणि सुराची साधना आयुष्यभर केली. त्यांनी गायलेली गाणी भारतातील अनेक पिढ्यांनी ऐकली आणि गायली आहेत. त्यांच्या निधनाने देशाच्या कला आणि संस्कृतीची मोठी हानी झाली. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.

Lata Mangeshkar Passes Away
Goa Assembly Election 2022: प्रचारादरम्यान एका मुलीसाठी स्मृती इराणींनी थांबवला ताफा

लता मंगेशकर गेल्या महिनाभरापासून आजारी होत्या. 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com