हल्याळ येथे शहीद जवानांना श्रद्धांजली

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वतीने  शहरातील छत्रपती शिवाजी चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

हल्याळ

हल्याळ येथे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना गलवान-कनवी खोऱ्यात चीन सैन्या विरुद्ध  झालेल्या चकमकीत  हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वतीने  शहरातील छत्रपती शिवाजी चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित कर्नाटक नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कम्मार, उपाध्यक्ष लक्ष्मण घाडी, नागराज पाटील, व्यंकटेश गौडा, नागराज मारी, परशुराम हाळियाळकर, विष्णू हुलस्वार, संजू अंत्रोळ कर, नागू डांगे, चंद्रकांत माळगी, सुनील शिंदे, नागराज गौडा व इतर मान्यवर उपस्थित होते.  

संबंधित बातम्या