बांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

या प्रकरणातील आरोपींविरोधात बंगळूरुमधल्या राममूर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीवर बलात्कार करुन व्हिडिओ बनवणाऱ्यांना बंगळूरु पोलिसांनी अखेर गजाआड टाकले. हा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींची शोधाशोध सुरु केली होती. या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजूजू (Kiren Rijiju) यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना (States and Union Territories citizens) आवाहन केलं होतं.  दरम्यान, या प्रकरणातील आरोपींविरोधात बंगळूरुमधल्या राममूर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mass atrocities on Bangladeshi girl Five men arrested over viral video)

एका तरुणीवर सामूहिकरित्या अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ आसाम पोलिसांच्या (Aasam Police )निदर्शनास आला. त्यानंतर आसाम पोलिसांनी तात्काळ व्हिडिओतील आरोपींची खात्री करुन घेण्यासाठी ही दृश्य सोशल मिडियावर शेअर करत या घटनेबद्दल काही माहिती असेल तर ती माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. आसाम पोलिसांचं ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी रिट्विट करत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलं. दरनम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरुच होता. त्यातच बंगळूरु पोलिसांना आरोपीबद्दलची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका महिलेसह आरोपींना अटक केली.

धक्कादायक! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती परतली घरी; कुटुंबियांची उडाली झोप

''व्हिडिओमधील दृश्य आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर दोन महिलांसह सहा जणांविरुध्द बलात्कार आणि हल्ला केल्याचा गुन्हा बंगळूरुमधील राममूर्ती  पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. पिडितेचा शोध घेण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले असून, तपासामध्ये पिडीतेची मदत घेण्याचा देखील प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत असल्याचं बंगळूरुचे पोलिस आयुक्त कमल पंत (Kamal pant) यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.''  हे सर्वजण एकाच ग्रुपमधले असून ते बांग्लादेशी आहेत. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडिता देखील बांग्लादेशची आहे. तिला भारतात विकण्यासाठी आणले होते. पैशाच्या वादावरुन तिचा छळ करुन क्रूरपणे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे,'' असंही पंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या