Dhanbad Hospital Fire Video: झारखंडमध्ये दवाखान्यात अग्नितांडव, सहा रूग्ण होरपळले; व्हिडिओ व्हायरल...

Dhanbad hospital Fire Video: झारखंडच्या धानबाद जिल्ह्यात हाजरा दवाखान्यात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत डॉक्टरांसह 6 जणांचा मृत्यू झाला.
Dhanbad Hospital Fire Video
Dhanbad Hospital Fire VideoDainik Gomantak

Dhanbad hospital Fire Video: झारखंडच्या धानबाद येथे शुक्रवारी मध्यरात्री एका दवाखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील हाजरा रुग्णालयाला लागलेल्या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.

या घटनेत हाजरा रुग्णालयांचे डॉ. विकास हाजरा आणि त्यांची पत्नी प्रेमा हाजरा तसेच ६ रुग्णांचा जळून मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या महितीनुसार शुक्रवारी रात्री रुग्णालयातून अचानक धुराचे लोट निघतांना नागरिकांना दिसले.

काही वेळातच मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघतांना दिसले. संपूर्ण दवाखाना आगीच्या भक्ष्यस्थानी काही वेळातच पडला. दवाखान्यातच डॉक्टर दाम्पत्य हे त्यांच्या खोलीत झोपले होते. आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दवाखान्यात तब्बल 25 रुग्ण भरती होते.

आगीची माहिती मिळताच तातडीने रुग्णांना कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. मात्र, आग वेगाने पसरल्याने 6 रुग्ण गंभीररित्या भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉक्टरच्या पुतण्याचाही आगीत मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या दुर्घटनेत 6 जण ठार झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मेडिकल ऑक्सीजनमुळे आग चांगलीच भडकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com