आगामी काळात कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही: मायावती 

आगामी काळात कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही: मायावती 
Mayavati said It will not form an alliance with any party in the near future

लखनऊ: आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही अशी घोषणा आज बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केली. आजवर वेगवेगळ्या पक्षांसोबत केलेल्या युती मधून बहुजन समाज पक्षाचं नुकसानच झालं आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आम्ही एकटे लढू असे  मत त्यांनी  व्यक्त केले त्या बहुजन समाज पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त माध्यमांशी बोलत होत्या.


"बहुजन समाज पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहिलेल्या कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली होती. दलित, वंचित, शोषित तसेच आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी मान्यवर  कांशीराम यांनी लढा दिला. आज त्यांच हे कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम फक्त बहुजन समाज पक्ष करत आहे. आमच्या पक्षाचा मतदार हा पक्षाच्या विचारांशी आणि भूमिकेशी बांधील आहे. मात्र आजवर आम्ही ज्या पक्षांसोबत युती केली त्या पक्षांची साथ आम्हाला मिळालाी नाही, त्यामुळे कुठल्याही युतीचा आम्हाला आजवर फायदा झालेला नाही," असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. 

आज उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असून, 2017 झाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला केवळ 18 जागा मिळालया होत्या. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे राज्यातल्या लहान लहान पक्षांना एकत्र घेत आघाडी करण्याची भूमिका घेऊन काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मायावतींना या निर्णयाचा कितपत फायदा होतो याकडे सगळ्यांचे लश्र लागले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com