कन्येसह आपल्याला पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा

PTI
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना कन्या इल्तिजा यांच्यासह नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना कन्या इल्तिजा यांच्यासह नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. पीडीपीचे नेते वाहिद उर रेहमान पारा यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास पोलिसांकडून मनाई केली जात असल्याचा आरोप मेहबुबा यांनी ट्विटरवर केला आहे.

पुलवामा येथे अटकेत असलेले वाहिद उर रेहमान पारा यांच्या घरी जाण्यापासून मेहबुबा आणि इल्तिजा यांना रोखण्यात येत असून त्यांना घरातच स्थानबद्ध केल्याचा दावा केला आहे. हिज्बुल मुजाहिदीन संघटनेकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मागितल्याच्या आरोपावरून वाहिद उर रेहमान यांना एनआयएने अटक केली आहे. या निवडणुकीत मुफ्ती पीडीपीच्या उमेदवार होत्या. मेहबुबा यांनी ट्विट केले की,  मला पुन्हा बेकायदापणे ताब्यात घेतले आहे. भाजपच्या मंत्र्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना काश्‍मीरमध्ये कोठेही फिरण्याची मुभा दिली जात आहे.

 

जम्मू काश्‍मीर प्रशासनाकडून व्यक्तिगत स्वातंत्र्य हे उपकाराच्या भावनेतून दिले जात आहे. सरकारच्या मर्जीने व्यक्तिगत स्वातंत्र्य बहाल केले जात आहे. यात न्यायालयाचा कोणताही हस्तक्षेप नसतो. 
- उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री

अधिक वाचा :

हजरत निझामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्‍सप्रेस २६ डिसेंबरपर्यंत रद्द 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

संबंधित बातम्या