जम्मू कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला; मेहबूबा मुफ़्ती यांनी दिली प्रतिक्रिया

जम्मू कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला; मेहबूबा मुफ़्ती यांनी दिली प्रतिक्रिया
mehbuba mufti.jpg

जम्मू-काश्मीरच्या (jammu And Kashmir) सोपोरमधील (Sopore) आरामपोरा येथील नाका येथे दहशतवाद्यांनी (Terrorist) पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस आणि दोन नागरिकांचा मृत्यु झाला असुन, अन्य दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला आहे. दहशतवाद्यांचा बचाव करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. जवळपासचे सर्व नाके सीलबंद केले आहेत. (Mehbooba Muftis reaction to the terrorist attack in Jammu and Kashmir)

यापुर्वी शुक्रवारी देखील काही दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला होता. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रीया देताना माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, आम्ही अशा हल्ल्यांचा निषेध करतो. अशा घटना होऊ नयेत कारण त्यामुळे जम्मू-काश्मीरमधाील प्रश्न सुटणार नाहीत. तसेच त्या पुढे असेही म्हणाल्या की, हे प्रश्न ना दिल्लीच्या बंदुकांनी सुटनार  ना इथल्या तरुणांनी बंदुका उचलल्याने सुटनार. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com