घराच्या नेमप्लेटवर 'जबरिया रिटायर्ड'चा उल्लेख करत अमिताभ ठाकूर यांचा केंद्रावर निशाणा 

amitabh thakur.jpg
amitabh thakur.jpg

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले. यामध्ये आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर,  यांच्यासह राजेश कृष्ण आणि राकेश शंकर यांना सक्तीने निवृत्ती दिली. कहितासाठी या अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त केल्याचं कारण देत केंद्राने त्यांना सक्तीची निवृत्ती दिली. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांच्याविरोधात त्यांनी धमकीचे आरोप केल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. याशिवाय यूपी प्रशासन त्यांच्याशी शत्रूप्रमाणे  व्यवहार करत असल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी  केडर बदलून देण्याची मागणीही केंद्र सरकारकडे केली होती. आता सक्तीने निवृत्त केल्यानंतरही ते पुन्हा चर्चेत आले आहेत. (Mentioning 'Jabaria Retired' on house nameplate, Amitabh Thakur targets Center) 

मात्र यूपीतील गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी ठाकूर अमिताभ ठाकूर यांच्या सक्तीच्या निवृत्तीचे आदेश काढले. अमिताभ ठाकूर हे १९९२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी होते. लोकहितासाठी ठाकूर यांचा सेवेत आता उपयोग नसल्याचे कारण देत केंद्र सरकारने त्यांना सेवेतून सक्तीने निवृत्त केल्याचे म्हटले आहे. अमिताभ ठाकूर यांनी स्वतः  या आदेशाची प्रत ट्विट करून याबाबतची माहिती दिली. यानंतर आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी आपल्या लखनऊतील  घराच्या दारावर एक नेमप्लेट लावली आहे. या नेमप्लेटवर 'जबरिया रिटायर्ड'  म्हणजे सक्तीने निवृत असा उल्लेख करण्यात आला आहे. सोबत त्यांनी या नेमप्लेटसोबत आपला फोटो काढून सोशल मिडियावर शेयर केला आहे. या नेमप्लेटमुळे त्यांना अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. याशिवाय त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रसरकारवरही निशाणा साधला आहे. 

यानंतर अमिताभ ठाकूर यांचे भाऊ आयएएस अविनाश कुमार यांनी गुरुवारी त्यांच्या फेसबुक पेजवर एक कविता शेयर केली आहे.  झारखंडमध्ये ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव म्हणून आयएएस अविनाश कुमार सध्या  कार्यरत आहेत. कवितेसमवेत त्यांनी आपली आई आणि भाऊ अमिताभ ठाकूर यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्या या पोस्टलाही संमिश्र प्रतिसाद येत आहेत.  अविनाश कुमार यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे की, 

तुम शर्म मत करना
ना मर्म ही करना
करना ही हो तो
मां तुम गर्व करना
वह वही है जिसको तुमने जन्म दिया
वह सही है जिसको तुमने वरण किया
वह निस्वार्थ है अभी भी
वह यथार्थ है आपका ही
गिरेगा नहीं मां वो
मरेगा नहीं हो
लड़ेगा जरूर मां, वो
झुकेका नहीं हो
शालीनता उसकी कमजोरी नहीं
मसखरापन उसका पागलपन नहीं
सादगी भी उसकी गरीबी नहीं
हंस कर सह लेना उनका बालपन नहीं
मां अगले जन्म फिर अमिताभ पैदा करना
भगवान हर घर में ऐसा ताज पैदा करना
नभ में सितारों के बीच मां
अपने इस विलक्षण पुत्र पर नाज करना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com