'मेट्रो मॅन' ई श्रीधरन केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

भारताचे मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ई श्रीधरन हे आगामी केरळ विधानसभा निवडणुक 2021 साठी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केली.

तिरूवनंतपूरम् :  भारताचे मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ई श्रीधरन हे आगामी केरळ विधानसभा निवडणुक 2021 साठी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केली. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी ई श्रीधर पक्षात सामील झाले होते. केरळ निवडणुकीत मेट्रो मॅन ई श्रीधरन यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे ही पक्षासाठी मोठी बाब मानली जात आहे. मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन एक प्रामाणिक अधिकारी म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत.

विधानसभा निवडणूक 2021: पेट्रोल पंपांवरुन पंतप्रधान मोदींच्या फोटोचे होर्डिंग्ज काढा; निवडणूक आयोगाचा आदेश

21 फेब्रुवारीला कासारगोड येथे झालेल्या विजय यात्रेवेळी ई श्रीधरन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता केरळमध्ये यावी यासाठीच राजकारणात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आगामी निवडणुकीत केरळमध्ये भाजपला सत्ता मिळ्यास मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळून राज्याच्या हिताची कामे करू, असंदेखील ते यावेळी म्हणाले. राज्यपालांसारख्या 'घटनात्मक' पदावर काम करण्यात रस नसल्याचे सांगताना,आपल्या राजकीय अजेंड्यात केरळवर असलेले कर्ज नाहीसे कऱणे, राज्यातील पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणे असल्याचे त्यांनी नमूद केले. योगायोगाने, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (DMRC) श्रीधरन यांचा आजचा शेवटचा दिवस आहे.

एआयएडीएमकेच्या नेत्या शशिकला यांचा राजकीय आणि सार्वजनिक जीवनाला गुडबाय

भाजपमधील प्रवेशावेळी त्यांना देशातील असहिष्णूतेबद्दल विचारले असता, देशात असहिष्णूतेच्या फक्त चर्चाच आहेत, आपली न्यायव्यवस्था कणखर असून, विरोधक उगाचच विरोध म्हणून असहिष्णुतेच्या चर्चा करत असल्याचे ई. श्रीधरन म्हणाले. "भाजपमध्ये जाण्याचे मुख्य कारण म्हणजे यूडीएफ आणि एलडीएफ दोन्ही सरकारे केरळमध्ये बर्‍याच गोष्टी करू शकले नाहीत. मला केरळसाठी काहीतरी करायचे आहे. त्यासाठी मला भाजपबरोबर उभे रहावे लागेल", असे 88 वर्षाय श्रीधरन म्हणाले. दरम्यान, केरळमधील विधानसभा निवडणूक 6 एप्रिलला पार पडणार असून,  मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. 
 

संबंधित बातम्या