छत्तीसगडच्या उत्तर भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

गुरुवारी सकाळी 11.57 च्या सुमारास सूरजपूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
earthquake
earthquake Dainik Gomantak

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सूरजपूर जिल्ह्यात गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली आहे. गुरुवारी सकाळी 11.57 च्या सुमारास सूरजपूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Mild Earthquake In Chhattisgarh)

earthquake
National Herald Case: काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे ईडीसमोर हजर

ते म्हणाले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीन इतकी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किमी खाली होता. भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या परिसरात आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

त्याचवेळी, सूरजपूरच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागामध्ये भूकंप झाल्याचे वृत्त आहे. अद्याप या परिसरात जीवित व वित्तहानी झाली नाही. या संदर्भात अधिक माहिती घेतली जात आहे तसेच गेल्या महिनाभरात राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही तिसरी वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com