मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वेची केली प्रशंसा

Pib
शुक्रवार, 3 जुलै 2020

सर्व राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्याची काळजी घेतली जाईल.

नवी दिल्ली, 

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी आज खते विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले; तसेच 30 जून 2020 या एकाच दिवशी 73 खतांचे (रेक्स) पोहचविण्यास मदत केली म्हणून, रेल्वे मंत्रालयाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. एकाच दिवसात एवढे खतांचे रेक्स पोहचविणे हा आतापर्यंतचा  एक विक्रमच आहे, असे गौडा यावेळी म्हणाले.

यावर्षी जून महिन्यात साधारणतः दरदिवशी 56.5 रेक्स पोहचविली जात होती. पण हा ऐतिहासिक विक्रमी आकडा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना, परवडणाऱ्या दरात वेळेवर खतांचा पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या खरीपाच्या हंगामासाठी, देशभरातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खतांचा स्थिर पुरवठा केला जाईल, यासाठी केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्याची काळजी घेतली जाईल.

संबंधित बातम्या