West Bengal: मंत्र्यांच्या अटकेनंतर सीबीआय कार्यालयावर तुफान दगडफेक

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) तृणमूल कॉंग्रेस (Trinmool Congress) सरकारच्या दोन मंत्र्यांसह 4 नेत्यांच्या अटकेने (Arrest) राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. 'अटकेची ही कारवाई भारतीय जनता पक्षाचे (BJP) षड्यंत्र असल्याचे म्हणत' तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय (CBI) कार्यालयावर दगडफेक देखील केली असल्याचे समजते आहे. त्यामुळे म्हणून सीबीआयच्या कार्यलयाबाहेर सध्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. (Ministers have been arrested by the CBI in West Bengal)

सीबीआयकडून नारदा स्टिंग प्रकरणात सोमवारी सकाळी बंगाल सरकारचे मंत्री फिरहद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा निषेध करण्यासाठी स्वत: सीएम ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात पोहोचल्या आहेत. सोमवारी सकाळी सीबीआयने या नेत्यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना कार्यालयात घेऊन आले. कोलकाताचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान राज्यपाल जगदीप धनखड  यांनी राज्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेविषयी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. 

COVID-19 लसीकरणासाठी आता आधार कार्डची गरज नाही: UIDAI चे स्पष्टीकरण 

राज्यातली बिघडलेली परिस्थिती चिंताजनक आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी बोलून त्यांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यास सांगितले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यकत ते सर्व निणर्य घेतले पाहिजेत. मात्र कोणतीच कारवाई केली जात नाही ही गोष्ट योग्य नसून यामुळेच परिस्थिती गंभीर होते असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल जगदीप धनखड यांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित बातम्या