'मुलगा व्हावा म्हणून 6 वर्षांच्या चिमुकलीला मारून तिचे काळीज खाल्ले'
black magic

'मुलगा व्हावा म्हणून 6 वर्षांच्या चिमुकलीला मारून तिचे काळीज खाल्ले'

कानपूर- उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात एका चिमुकलीचे शव सापडले. दिवाळीच्या रात्री तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी चर्चा करायला सुरूवात केली. प्रकरण वाढल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: दखल घेतली. मृत मुलीच्या घरच्यांनी तिचा बळी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांनी वेगळी शक्यता वर्तवली असून त्यांच्यानुसार बलात्काराच्या प्रयत्नानंतर हत्या झाल्याचा संशय आहे.  

काय आहे घटना- 

कानपूरमधील एका गावातील घटना असून दिवाळीच्या रात्री मुलगी घराच्या बाहेर खेळत होती. परिवारातील काही सदस्य शेतात गेले होते. त्या परिवारातील महिला दिवाळीच्या पूजेत व्यस्त होत्या. याच दरम्यान दिवे लावण्यासाठी मुलीला आवाज दिला असता मुलगी तेथे नसल्याचे समजले. यानंतर सर्वत्र शोधूनही मुलगी न सापडल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांकडून सकाळपर्यंत वाट पहा, असे सांगण्यात आले.  

पुढच्याच दिवशी पहाटे मुलीचा मृतदेह काही गावकऱ्यांनी पाहिला. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपासाला गती दिली.

‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तांत्रिकाच्या सहभागाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात काळ्या जादूसाठी चिमुकलीचे काळीज काढून टाकण्यात आले आहे. आरोपींनी याबाबत कबुली देताना सांगितले की, चिमुकलीला मारून तिचे काळीज काढून आणण्यासाठी मुलीच्या काकानेच त्यांना पैसे दिले होते. दोघी आरोपींनी तिला चिप्सच्या पॅकेटची लोभ देत तिला पकडून घेऊन गेले. यानंतर आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही त्यांनी कबूल केले.  

तिसऱ्या आरोपीने वरील दोघांना पैसे दिले होते. संबंधित आरोपीचे नाव परशुराम असून त्याच्याकडील तपासात त्याने सांगितले की, सन 1999 मध्ये लग्न झाल्यानंतर त्याला अनेक वर्षांनंतरही पुत्रप्राप्ती झाली नाही. त्यामुळे तंत्र-मंत्र करण्यासाठी त्याने मुलगीचे काळीज मागितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याच्या पत्नीने ते काळीज खाल्ले तर त्याला कदाचित पुत्रप्राप्ती होईल. त्याला असे का वाटले त्यावर रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या एका पुस्तकात त्याने वाचले असे त्याचे म्हणणे आहे. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com