पठ्याने वर्गातच मंगळसूत्र बांधून केलं प्रेयसीशी लग्न; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोडावं लागलं कॉलेज

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

या जोडप्याचे अफेयर आणि त्यांनी केलेलं अजब लग्न या नेटकऱ्यांसाठी हॉट टॉपिक ठरले आहे. त्यांनी हे लग्न गंमत म्हणून केलंय की खरंच याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

'फेस्टीव्ह कंट्री' म्हणून जगभरात ख्याती असणाऱ्या भारतात लग्नेही काही समारंभांपेक्षा कमी नाहीत. एक ना अनेक प्रथा आणि परंपरांमुळे भारतातील लग्ने कायमच वेगळी ठरतात. मात्र, आंध्र प्रदेशमधल्या गोदावरी जिल्ह्यातील राजामुंड्री कनिष्ठ महाविद्यालय याला अपवाद ठरले आहे. या महाविद्यालयातील एका अल्पवयीन जोडप्याने चक्क महाविद्यालयातील एका वर्गातच लग्न केले आहे. मागील महिन्याच्या 17 तारखेला हे लग्न केले असून मुलगा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याचा व्हि़डिओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या लग्नाबद्दल माहिती मिळाल्यानंतर संबंधित जोडप्याला महाविद्यालयातून काढून टाकण्याचा निर्णय प्राचार्यांनी घेतला. यानंतर हे प्रकरण संपले आहे असेच सर्वांना वाटले असेल. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे पालकही त्यांनी केलेले कृत्य पाहून अचंबित झाले आहेत.
 
या जोडप्याचे अफेयर आणि त्यांनी केलेलं अजब लग्न या नेटकऱ्यांसाठी हॉट टॉपिक ठरले आहे. त्यांनी हे लग्न गंमत म्हणून केलंय की खरंच याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, त्यांचे हे लग्न केवळ आंध्र प्रदेशच नाही तर संपूर्ण भारतात चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.  

संबंधित बातम्या