काय आहे Post Office Scheme? ज्यामुळे मिळणार दरमहा 3300 रूपये पेन्शन

पोस्ट ऑफिसच्या अशा सुपरहिट योजनेबद्दलची तुम्हाला माहिती आहे का?
MIS Post Office Scheme:  Deposit Rs 50,000 and get Rs 3300 monthly pension
MIS Post Office Scheme: Deposit Rs 50,000 and get Rs 3300 monthly pensionDainik Gomantak

नवी दिल्ली: Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिस योजना सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) वेळोवेळी खूप चांगल्या योजना सुरू करत राहते. अशा एका सुपरहिट योजनेबद्दलची ही माहिती ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा (Post Office MIS Scheme Benefits) मिळेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला एकदा पैसे जमा करावे लागतील आणि नंतर तुम्हाला दरमहा पेन्शन प्रमाणे व्याजाचे पैसे मिळत राहतील.

MIS Post Office Scheme:  Deposit Rs 50,000 and get Rs 3300 monthly pension
World Tourism Day: भारतामध्ये काय आहे? म्हणनाऱ्यांनी एकदा फिरून बघाच!

काय आहे ही नविन योजना?

ही एक पोस्ट ऑफिस योजना आहे- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते Post Office Monthly Income Scheme Account (MIS) तयार करते. या योजनेत किमान 1000 आणि 100 च्या पटीत पैसे जमा करता येतात. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करू शकता. लक्षात घ्या की ही मर्यादा एकाच खात्यासाठी आहे. त्याच वेळी, ज्वाइंट अकाउंटची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे. जास्तीत जास्त तीन लोक या योजनेअंतर्गत ज्वाइंट अकाउंट उघडू शकतात. तसेच, जर एखादा मुलगा अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांच्या नावे त्याला खाते उघडता येते. 10 वर्षांनंतर पोस्ट ऑफिस एमआयएस खाते मुलाच्या नावाने देखील उघडले जाऊ शकते.

किमान 1000 रुपये जमा केले जाऊ शकतात

या योजने अंतर्गत मासिक पेमेंट मिळणार आहे. सध्या व्याज दर 6.6 टक्के आहे, जो साध्या व्याजाच्या कॅल्क्युलेशनवर उपलब्ध आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. परंतु, जर खातेदाराने यात मासिक व्याजाचा दावा केला नाही, तर त्याला या पैशावरील अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही.

MIS Post Office Scheme:  Deposit Rs 50,000 and get Rs 3300 monthly pension
ह्रदयस्पर्शी! कुटुबांला हातभार लावण्यासाठी 14 वर्षीय मुलगा विकतोय 'दही कचोरी'

5 वर्षांची मॅच्योरिटी

या पोस्ट ऑफिस योजनेची मॅच्योरिटी 5 वर्षाची आहे. खाते उघडल्यानंतर एक वर्ष होईपर्यंत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही. जर तुम्हाला ती 1-3 वर्षांच्या आत बंद करायची असेल तर तुमच्या मूळ रकमेच्या 2% रक्कम कापली जाईल. त्याच वेळी, 3-5 वर्षांच्या आत खाते बंद केल्याबद्दल 1 टक्के दंडही कापला जाईल.

4.5 लाखांच्या ठेवीवर दरमहा 2475 रुपये मिळणार

एमआयएस कॅल्क्युलेटरनुसार, जर कोणी या खात्यात एकदा 50 हजार रुपये जमा केले तर त्याला दरमहा 275 रुपये म्हणजेच पाच वर्षांसाठी 3300 रुपये दरवर्षी मिळतील. म्हणजेच पाच वर्षात त्याला एकूण 16500 रुपये व्याज म्हणून मिळतील. त्याचप्रमाणे, जर कोणी 1 लाख जमा केले तर त्याला दरमहा 550 रुपये, दरवर्षी 6600 रुपये आणि पाच वर्षांत 3300० रुपये मिळतील. या योजनेत 4.5 लाख जमा केल्यावर, तुम्हाला दरवर्षी 2475 रुपये, वार्षिक 29700 रुपये आणि व्याजाच्या विचार केला तर 148500 रुपये पाच वर्षांत मिळतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com