#माफ़ी_माँग_ओबामा ट्विटरवर ट्रेंडींग; ओबामांनी केलेल्या राहूल गांधींच्या वर्णनानंतर ट्विटरकर तापले

#माफ़ी_माँग_ओबामा ट्विटरवर ट्रेंडींग; ओबामांनी केलेल्या राहूल गांधींच्या वर्णनानंतर ट्विटरकर तापले
BARACK OBAMA AND RAHUL GANDHI

वॉशिंग्टन-  काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे व्यक्तिमत्व चिंतेने भरलेले आहे. असे आपल्या आत्मचरित्रात वर्णन करणाऱ्या अमेरिकेच्या राष्टाध्यक्षांविरोधात काँग्रेसच्या समर्थकांनी ट्विटरवर संताप व्यक्त करायला सुरूवात केली आहे. राहूल गांधी यांचा अपमान केला अशी भावना व्यक्त करताना #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंग केला आहे. मात्र, काही राहूल गांधी विरोधकांनीही हाच हॅशटॅग वापरत बराक ओबामा योग्य तेच बोलले, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे व्यक्तिमत्व चिंतेने भरलेले आहे, असे वर्णन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या 'अ प्रॉमिस्ड लँड' या आत्मचरित्रात केले आहे. माजी  पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या स्वभावाचे वर्णनही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केले आहे.  

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्या आत्मचरित्राचा काही अंश अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी राहूल गांधी यांचे वरील वर्णन केले आहे. 'आपला अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परंतु, आपल्या विषयात प्राविण्य मिळवण्याची क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यासारखे राहूल गांधी यांचे व्यक्तिमत्व आहे,' असेही बराक यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.     

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com