AK-47 अन् हँडग्रेनेड बाळगल्याप्रकरणी MLA अनंत सिंग यांना सुनावली 10 वर्षांची शिक्षा

वडिलोपार्जित घरामध्ये एके-47 आणि ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Anant Kumar Singh
Anant Kumar Singh Dainik Gomantak

मोकामा येथील आरजेडीचे बाहुबली आमदार अनंत सिंग (Anant Kumar Singh) यांना लडमा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये एके-47 आणि ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (MLA Anant Singh sentenced to 10 years for carrying AK 47 and hand grenade)

Anant Kumar Singh
Agnipath Scheme: तिन्ही लष्करप्रमुख घेऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

घरातून एके-47 आणि ग्रेनेड जप्त केल्याप्रकरणी अनंत सिंगला यांना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी अनंत सिंग यांना मंगळवारी पाटण्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या दाव्यावर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अनंत सिंह यांना दोषी ठरवण्यात आले आणि आता एमपी-एमएलए न्यायालयाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह सध्या पाटणा येथील बेऊर तुरुंगामध्ये आहेत.

बिहारचे बाहुबली आमदार समजले जाणारे अनंत सिंह यांच्याविरुद्ध सुरू असलेला खटला बिहार सरकारने विशेष प्रकरणाच्या श्रेणीमध्ये ठेवला आहे. आरोपींविरुद्धच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती देखील करण्यात आली होती. या खटल्याचीही जलदगतीने सुनावणी सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com