
विनापरवानगी सभा घेतल्याने आपल्या अडचणीत वाढ करुन घेतलेले गुजरात येथील वडगावचे आमदार लागला असून या निकालांती एकूण 10 जणांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. दोषींना तीन महिने कारावास आणि प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात मेवाणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रेश्मा पटेल यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. (MLA Jignesh Mewani convicted for illegal rally )
2017 साली बेकायदेशीर पध्दतीने सभा घेऊन परवानगी नसतानासुद्धा मोठ्या संख्येने लोकांना एकत्र जमा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ही रॅली गुजरातच्या मेहसाणा शहरातून काढण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांनी याबाबत निकाल देताना काही निरीक्षणांची नोंद केली आहे. यामध्ये “रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे”, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन कधीही सहन केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
१२ जुलै २०१७ रोजी उना येथील घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्याने आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहसाणा ते धानेरापर्यंत ‘आझादी कूच’ रॅलीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंच या संघटनेच्या बॅनरखाली रॅलीसाठी मेहसाणा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. सुरवातीला ही परवानगी देण्यात आली होती मात्र नंतर परवानगी दिल्याचा निर्णय मागे घेत ही परवानगी नाकारली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.