'ओपनिंग सुरु', गुजरात काँग्रेसला निवडणूक रणनीतीकाराची गरज
Rahul GandhiDainik Gomantak

'ओपनिंग सुरु', गुजरात काँग्रेसला निवडणूक रणनीतीकाराची गरज

गुजरातमधील दाहोद येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी आमदारांची विशेष बैठक घेतली.

गुजरातमधील दाहोद येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी आमदारांची विशेष बैठक घेतली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्यासमोर अनेक मागण्या ठेवल्याचे वृत्त आहे. यामध्ये राज्यात मजबूत चेहऱ्याच्या मागणीचा समावेश आहे. त्याचबरोबर निवडणूक रणनीतीकारांची इच्छाही नेते व्यक्त करत असल्याचेही बोलले जात आहे. विधानसभेच्या 182 जागा असलेल्या गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दाहोदमध्ये आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. आदिवासींच्या भेटीनंतर त्यांनी आमदारांसोबत बंद खोलीत विशेष बैठक बोलावली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) प्रशांत किशोर काँग्रेससाठी निवडणूक रणनीतीकार बनणार असल्याची चर्चा सुरु होती.

Rahul Gandhi
राजद्रोहाचं कलम कोर्टाकडून तुर्तास स्थगित

अहवालानुसार, काँग्रेसला विशेष कामगिरी करता आली असती, असे अनेकांचे मत आहे. काँग्रेस नेत्यांनी ग्राउंड लेव्हलवर ठोस रणनीती आखू शकेल अशा निवडणूक रणनीतीकाराची मागणी केली आहे.

Rahul Gandhi
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिलीच विधानसभा निवडणूक | Gomantak Tv

वृत्तानुसार, बैठकीदरम्यान, पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधींना गुजरातचे आणखी दौरे आयोजित करण्यास आणि अधिक रॅली आणि रोड शो आयोजित करण्यास सांगितले आहे. याशिवाय प्रियांका गांधी वढेरा यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात यावे, अशी मागणी पक्ष नेतृत्वाने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या आमदारांनी गुजरातमध्ये पक्षासाठी मजबूत चेहरा देण्याची मागणी केली आहे. पक्षाचा चेहरा कोणत्याही वादात अडकू नये आणि त्याला प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे, असे आमदारांनी राहुल यांना सांगितले आहे.

याशिवाय, गुजरात काँग्रेस (Congress) आमदारांनी महिला आमदारांना अधिक संधी देण्याची मागणी केली आहे. राज्यात महिला आमदारांची संख्या जास्त असावी यावरही एकमत झाले. वृत्तानुसार, गोपनीयतेच्या अटीवर बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेस आमदाराने सांगितले की, राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, "आपण पक्षापेक्षा मोठे आहोत, असे कोणीही समजू नये. पक्षाला पहिल्यांदा प्राधान्य द्यावे, व्यक्तीला नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.